Home क्राईम #wani crime.. रोड रॉबरीतील त्या आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी

#wani crime.. रोड रॉबरीतील त्या आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी

585

8 महिन्यानंतर गवसला आरोपी

वणी: ब्राम्हणी मार्गावर 8 महिन्यांपूर्वी 45 लाख रुपयांची रोड रॉबरी करण्यात आली होती. यातील आरोपी पोलिसांना गुंगारा देत असतानाच राजस्थान मधून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आठ महीन्यांपर्वी 20 मार्च ला दुपारी बँकेतून काढलेले 45 लाख रुपये सुपरवायझर मनिष जंगले इंदिरा जिनिंग मध्ये दुचाकीने घेवून जात होते. त्याचवेळी चारचाकी वाहनाने आलेल्या आरोपींनी जंगले यांना मारहाण करून 45 लाख रुपयांची रोकड हिसकावुन पोबारा केला होता.

भरदिवसा घडलेल्या या रोड रॉबरीमुळे शहरात चांगलीच खळबळ माजली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली यातील master mind बाबूलाल बिष्णोई ला 14 एप्रिल ला अटक करण्यात आली होती मात्र अन्य आरोपीचा सुगावा लागत नव्हता.

SDPO संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, गजानन गोडंबे, विशाल गेडाम, इम्रान खान हे पोलिसांचे पथक राजस्थानात पोहचले. 15 डिसेंबरला कुख्यात आरोपी ओमप्रकाश बिष्णोई ला ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरोडयात सहभागी असलेले आरोपी हे कुख्यात गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्यावर राजस्थानसह इतर राज्यात गुन्हे दाखल असल्याची माहीती पोलीसांना मिळाली आहे. मात्र आठ महीने लोटुनही आत्तापर्यंत पोलीसांना केवळ तिन आरोपीच गवसले आहे. अन्य आरोपींचा शोध घेऊन रोकड हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.