Home Breaking News अखेर….त्या वृद्ध महिलेचा मृतदेह गवसला

अखेर….त्या वृद्ध महिलेचा मृतदेह गवसला

461

वणी: तालुक्यातील कोना येथे वास्तव्यास असलेली 70 वर्षीय महिला रविवारी वर्धा नदीत बुडाली होती. ग्रामस्थांनी सलग दोन दिवस नदीपात्रात शोध मोहीम राबविली असता मंगळवार दि. 21 डिसेंबर ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान मृतदेह गवसला.

मंजुळा महादेव तुराणकर (70) ही वृध्दा रविवारी दुपारी 5 वाजताचे सुमारास ती शेतातून हरभऱ्याची भाजी आणण्यासाठी शेतात गेली होती. बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही यामुळे पारिवारिक मंडळींनी तिचा शोध सुरू केला होता.

वर्धा नदी लगतच असलेल्या शेतातून ती नदीपात्रात उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी ग्रामस्थांना सांगितले. यामुळे ती नदीत तर बुडाली नाही ना असा संशय बळावला होता. याबाबत पोलीस तसेच महसूल विभागाला सूचित करण्यात आले होते.

ग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता तिचा मृतदेह आढळून आला. ती वृध्दा नदीत उतरली की, घसरून पडली याबाबत विस्तृत माहिती प्राप्त होवू शकली नाही.
वणी: बातमीदार