Home क्राईम तो…अट्टल चोरटा पोलिसांच्या ताब्यात

तो…अट्टल चोरटा पोलिसांच्या ताब्यात

720

सिनेस्टाईल पाठलाग करून ‘गब्ब्या’ला पकडले

वणी : त्याने शहरातील एका धान्याच्या दुकानातून तांदळाची चोरी केली. तो चोरीचा माल चोरी केलेल्या वाहनातून नेत असतांना पोलिसांनी पाठलाग करून अट्टल चोरट्याला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार दि. 21 डिसेंबर ला करण्यात आली.

नावेद उर्फ गब्या मो कादिर (39) रा. मोमीनपुरा असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गब्या हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या शिरावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. त्याला या पूर्वी न्यायालयाने चोरीच्या गुन्ह्यात शिक्षाही ठोठावली होती.

ठाणेदार श्याम सोनटक्के यांना ‘गब्या’ हा चोरी केलेले तांदूळ विक्री करिता वाहनातून नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिस घुग्गुस मार्गावर असलेल्या वागदरा गावा नजीक उभ्या असलेल्या वाहना जवळ पोहचताच गब्याने तिथून पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी MH- 29- T- 3416 या क्रमांकाच्या वाहनांची तपासणी केली असता वाहनात तांदळाचे 7 कट्टे, काही भंगार साहित्य आढळून आले. पोलिसांनी वाहनासह एकूण 3 लाख 66 हजार 579 मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलिप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे, पोउपनि शिवाजी टिपूर्णे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, हरविंदर भारती, अविनाश वनकर यांनी केली.
वणी: बातमीदार