Home सामाजिक गुरुवारी भव्य आरोग्य शिबीर

गुरुवारी भव्य आरोग्य शिबीर

295

आमिर बिल्डर्स चा उपक्रम

वणी- आमिर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या वतीने येथील आशियाना हॉल मध्ये दि 30 डिसेंबर ला मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वातावरणात होणाऱ्या सतत च्या बदला मुळे अनेक आजारांनी डोके वर काढले आहे.त्यामुळे गोरगरीब जनतेला वैद्यकीय उपचारासाठी पैसे मोजावे लागत आहे. येथील आमिर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक जमीर खान यांनी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानिमित्याने गुरुवार दि 30 डिसेंबर ला येथील अशियाना हॉल मध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात स्त्री रोग तज्ञ डॉ महेंद्र लोढा,डॉ प्रेमानंद आवारी, मूत्ररोग तज्ञ डॉ अमित देशपांडे नागपूर,डॉ सूरज चौधरी,बालरोग तज्ञ संदीप मानवटकर,डॉ पवन राणे,नेत्र तपासणी स्वप्नील गोहोकार,अस्थीरोग तज्ञ सुबोध अग्रवाल तपासणी करून औषधी उपचार करणार आहे.तरी या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन जमीर खान मित्र मंडळाने केले आहे.


  1. वणी : बातमीदार