Home Breaking News घरावर झाड कोसळले, झोपेतच महिला ठार

घरावर झाड कोसळले, झोपेतच महिला ठार

627

टिनपत्र्याचे घर झाले चेंदामेंदा

घाटंजी : गुरुवारी पहाटे 7 वाजताच्या सुमारास टिनपत्र्याचे असलेल्या घरावर महाकाय झाड कोसळले. घराचा चेंदामेंदा झाला असून घरात गाढ झोपेत असलेली 30 वर्षीय महिला ठार झाली. सदर घटना घाटंजी शहरात बेलोरा मार्गावरील शनि मंदीर परिसरात घडली.

रंजना संजय मोतेवार (30) असे मृतक महिलेचे नाव असून त्या शनि मंदीर परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांच्या घरा लगतच मोठे झाड होते त्या झाडाची मुळे कमकुवत झालेली असावी त्यातच पडलेला अवकाळी पाऊस यामुळेच झाड कोसळले असावे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

शनी मंदिर परिसरात अतिक्रमित जागेवर बांधलेले कच्चे घर होते. घरा समोरच टिनपत्र्याचे शेड काढलेले होते त्याच छता खाली लाकडी पलंगावर महिला झोपली होती आणि ही दुर्दैवी घटना घडली. तर घटनेच्या दिवशी सकाळीच पती संजय बाहेर गेला होता तर पाच वर्षांचा मुलगा आजोळी गेल्यामुळे ते दोघेही बचावलेत.

घटनेची वार्ता वाऱ्या सारखी परिसरात पसरली. घटनास्थळावर बघ्यांची तोबा गर्दी जमली होती. या प्रकरणी तात्काळ पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घाटंजी: बातमीदार

Previous articleगुरुवारी भव्य आरोग्य शिबीर
Next articleआ. बोदकुरवार यांना मातृशोक
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.