Home वणी परिसर सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

580

भव्य विक्री व प्रदर्शनी

वणी :- एकच ध्येय हात माझा मदतीचा,ओबीसी महिला समन्वय समिती व धनोजे कुणबी महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमा सह भव्य विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

एस बी लॉन येथे तिन दिवसीय चालणाऱ्या या विक्री प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी किरण देरकर होत्या तर एकच ध्येय हात माझा मदतीचा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अर्चना बोदाडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी मंचावर कविता चटकी अध्यक्षा धनोजे कुणबी शारदोत्सव समिती, प्रमुख वक्त्या अँड वैशाली टोंगे उपस्थित होत्या.

अँड वैशाली टोंगे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले यावेळी व्यासपीठावर वंदना आवारी, मिनाक्षी देरकर साधनाताई गोहोकर वनीता काकडे, संध्या रामगिरवार, भूमी निमकर, स्मीता नांदेकर, साधना मते, अर्चना गंजीवार, मिनाक्षी गोरंटीवार, सविता गौरकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

माला देरकर,अनिता पेचे, गितांजली माथनकर
यांनी स्वागत गीत सादर केले. या विक्री व प्रदर्शनात विविध खाद्य पदार्थ, ज्वेलरी, कपडे अशी विवीध प्रकारची 39 दुकाने लावण्यात आली.सुत्रसंचालन गितांजली माथनकर (अतकारे)यांनी तर आभार माला देरकर यांनी मानले.या कार्यक्रमाचे आयोजन अर्चना बोदाडकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
वणी : बातमीदार