Home Breaking News सावधान..कोरोनाची (Corona) तिसरी लाट भयावह..!

सावधान..कोरोनाची (Corona) तिसरी लाट भयावह..!

577
राज्यात 80 लाख व्यक्ती बाधित होण्याची शक्यता
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा

वणी: राज्यात गेल्या काही काही दिवसांपासून कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नव वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात 4 जानेवारी ला तब्बल 11 कोरोना बाधित आढळलेत. त्यातच तालुक्यात एक महिन्या नंतर दोन कोरोना बाधित आढळल्याने वणीकर तथा तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यात पहिल्या लाटेत 20 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत 40  लाख लोक कोरोना बाधित झालेत, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्यात जवळपास 80 लाख लोक कोरोना बाधित होण्याची शक्यता आहे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भीती व्यक्त केली आहे.

राज्यात कडक निर्बंध लावावेत का ? (lockdown) या बाबत आरसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे health minister राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राज्यात जर कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असेल तर निर्बंध लावण्यास हरकत नाही असे सांगण्यात आले आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयु साठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला ( NHM) केंद्राने परवानगी दिलेली नाही. केंद्र सरकारने मान्यता द्यावी शिवाय NHM कडून या आधिची राहिलेली रक्कम देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याचे health minister टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती भयावह आहे, 13 मंत्री आणि 70 आमदार कोरोना बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे बोलल्या जात आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसारताच नागरिक बिनधास्त झाले होते. कोविड त्रिसूत्रीचे पालन नागरिक पूर्णतः विसरलेत आणि दबा धरून बसलेल्या कोरोनाने डाव साधला. वणीत नोव्हेंबर महिन्यात 4 बाधित आढळले होते. मावळत्या वर्षात एकही कोरोना बाधित आढळला नाही मात्र नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्यात दोन कोरोना बाधित आढळल्याने नागरिकांनी सतर्क व कोविड त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी: बातमीदार