Home Breaking News जैताई मातृगौरवं पुरस्कार प्राप्त सिंधुताईची “एक्झिट”

जैताई मातृगौरवं पुरस्कार प्राप्त सिंधुताईची “एक्झिट”

266

अनाथांची माय ईश्वर चरणी लीन

वणी: सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले सेवाकार्य अभूतपूर्व आणि अविस्मरणीय आहे. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. सिंधुताईंना सामाजिक कार्यासाठी येथील कुल स्वामींनी जैताई माता देवस्थान च्या वतीने मातृगौरवं पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याच “अनाथांची माय”आज दि. 4 जानेवारीला अनंतात विलीन झाल्या आहेत.

सिंधुताईंचा जन्म 14  नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावात झाला. त्याच्या वडिलांचे नाव ‘अभिमान साठे’ होते, ते शेत मजूर होते. पशुधन चराईचे काम ते करत असायचे. सिंधुताई जेव्हा 10 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे 30 वर्षांच्या ‘श्रीहरी सपकाळ’ यांचे बरोबर लग्न झाले होते.

सिंधुताई 20 वर्षांच्या असताना त्या 3 मुलांची आई होत्या. गावातील प्रमुखाने बदला घेण्यासाठी पती श्रीहरी ला (सिंधुताईचा नवरा) यांना सिंधुताईला घराबाहेर काढण्यास भाग पाडले आणि त्यानंतरच सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथांना समर्पित केले.

सिंधुताई यांनी 1050 अनाथांना दत्तक घेतले आहे. आज त्याच्या कुटुंबात त्याला 207 जावई आणि 36 सून आहेत. येथे 1000 हून अधिक नातवंडे आहेत. त्याची स्वतःची मुलगी एक वकील आहे आणि आज दत्तक घेतलेली बरीच मुले डॉक्टर, अभियंते, वकील आहेत आणि त्यांच्यापैकी बरेचजण स्वत: चे अनाथाश्रमही चालवतात.

सिंधुताई यांना एकूण 273 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात “अहिल्याबाई होळकार पुरस्कार” मिळाला आहे. वणीतील जैताई मातृगौरवं पुरस्कार हा राज्यात मानाचा पुरस्कार आहे तो सुद्धा सिंधुताई यांना प्रदान करण्यात आला आहे.

सिंधुताई सपकाळ यांची ‘एक्झिट’ सर्वसामान्य माणसाला हादरा देणारी आहे.त्यांच्या पार्थिवावर दि. 5 जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार
(“रोखठोक” परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)