Home Breaking News धारदार शस्त्र घेऊन युवकाचा धुमाकूळ

धारदार शस्त्र घेऊन युवकाचा धुमाकूळ

1424

युवक ताब्यात, वणी पोलिसांची कारवाई

वणी:– शहरातील रंगनाथ नगर येथे 20 वर्षीय युवकाला हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालतांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवार दि. 5 जानेवारीला सायंकाळी घडली.

मोहमद समीर मोहमद गनी (20) रा. खरबडा मोहल्ला असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजताचे सुमारास रंगनाथ नगर येथे एक ईसम हातात धारदार गुप्ती घेवुन धुमाकुळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असता युवक राजु झिलपे यांचे घरा जवळ सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार गुप्ती घेवुन धुमाकुळ घालत असतांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचे जवळून गुप्ती जप्त करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरीन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास सफौ सुदर्शन वानोळे हे करीत आहे.

वणी: बातमीदार