Home क्राईम त्याने…. पत्नीच्या डोक्यात हाणला लोखंडी ‘रॉड’

त्याने…. पत्नीच्या डोक्यात हाणला लोखंडी ‘रॉड’

936

शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल

वणी: तालुक्यातील भालर येथे 25 वर्षीय पत्नीच्या डोक्यात व्यसनी पतीने लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास आरंभला आहे.

अजित आनंदराव ढवस (30) हा भालर येथे वास्तव्यास आहे. तो मागील तीन महिन्यापासून पत्नीला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास देत असून माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावत होता.

पीडितेच्या तक्रारीनुसार अजित हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. माहेरवरून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करायला लागला. त्याच सोबत लहानग्या मुलीला धक्काबुक्की करत होता. त्याचवेळी त्याने लगत असलेला लोखंडी रॉड डोक्यात हाणला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शुभांगी अजित ढवस (25) असे पीडित पत्नीचे नाव असून त्यांनी पतीच्या जाचाला कंटाळून माहेर गाठले. आणि वर्धा जिल्ह्यात नवरोबा विरोधात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भादवि कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
वणी: बातमीदार