Home Breaking News वणी ते सावंगी(मेघे) मोफत बससेवा सुरू

वणी ते सावंगी(मेघे) मोफत बससेवा सुरू

1619

आमदार व ठाणेदारांनी दाखवली हिरवी झेंडी

वणी:– आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांना मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या निःशुल्क सेवेचा शुभारंभ दि 7 जानेवारीला करण्यात आला.

वणी परिसरातील अनेक रुग्ण उपचार करण्यासाठी सावंगी मेघे येथे जात असतात. त्यांना जाण्याकरिता वाहन उपलब्ध नसल्याने रुग्णांना व नातेवाईकांना खूप त्रास सहन करावा लागत होता.

रुग्ण व त्यांच्या परिवाराला जाण्याची सुलभ सोय व्हावी याकरिता प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी पुढाकाराने आचार्य विनोभा भावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दर शुक्रवारी मोफत बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर सेवा दि. 7 जानेवारी पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

सकाळी 9 वाजता येथील टिळक चौक येथे वाहन चालकाचा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बसला फिरवी झेंडी दाखवण्यात आली.

यावेळी प्रेस वेलफेअर अससोसिएशन चे अध्यक्ष रवी बेलूरकर, सचिव तुषार अतकारे, नगर परिषद माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, सत्तारभाई फुलवाले, प्रमोद लोणारे, चंदन मोहूर्ले, ऍड प्रवीण पाठक, पंकज कासावार, प्रणव पिंपळे, नितीन बिहारी, शुभम गोरे, नाना फाटाले, संदीप मदान, वैभव मांडवकर, नंदू नागदेव, सुभाष कुरिल, आनिल माहपुरे उपस्थित होते.
वणी: बातमीदार