Home Breaking News त्या कर्मचाऱ्यांनी मागितले आमदारांनाच ‘राशन’

त्या कर्मचाऱ्यांनी मागितले आमदारांनाच ‘राशन’

687

कुटुंबावर उपासमारीची वेळ

वणी: राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी राज्यशासनात विलगिकरण करा या मागणी करिता मागील 65 दिवसापासून संप करताहेत. त्यामुळे महामंडळाने त्यांचे वेतन बंद केल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याने चक्क आमदारालाच राशन पुरविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

राज्यात एसटी महामंडळातील कर्मचारी 65 दिवसापासून संपावर आहेत. राज्य शासनाने अनेकदा संप मागे घेण्यासाठी आवाहन केले मात्र कर्मचारी विलनिकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. दोन्ही बाजूने तोडगा निघत नाही यामुळे शासनाने निलंबन व सेवा समाप्तीचे हत्यार उगारले तरीही कर्मचारी ऐकताना दिसत नाही.

याबाबत एसटी महामंडळातील कर्मचारी नेत्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पगाराअभावी परिवारावर उपासमारीची वेळ आल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांना भाजपा आमदारांकडून एक- दोन महिन्याचा राशन पुरवठा कऱण्यात येईल अशी हमी देण्यात आली होती.

वणी आगारातील 66 कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे भाजपाचे स्थानिक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेकडे निवेदन देऊन राशन पुरवठा करण्याची मागणी केली असता आमदारांनी लवकरच राशन देण्याचे आश्वाशीत केले आहे.
वणी: बातमीदार