Home Breaking News वणीत आज पुन्हा एक कोरोना ‘बाधित’

वणीत आज पुन्हा एक कोरोना ‘बाधित’

935

तरी सुद्धा नागरिक बिनधास्त

वणी: नव वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या आठवड्यात सातत्याने कोरोना बाधित आढळलेले असताना शहरात नागरिक मात्र बिनधास्त वावरताहेत. शनिवार दि. 8 जानेवारीला प्राप्त अहवालात एक पॉझिटिव्ह आढळून आला.

राज्यात कोरोनाचा ग्राफ वाढत असतानाच जिल्हा तसेच तालुक्यात कोरोना बाधित निष्पन्न होताहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 44 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 133 व बाहेर जिल्ह्यात 13 अशी एकूण 146 झाली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळत असताना महसूल, पालिका व आरोग्य विभाग अद्याप जागे झाल्याचे दिसत नाही किंबहुना प्रतिबंधनात्मक उपाययोजना करताना निदर्शनास आलेले नाहीत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या लाटेत जी खबरदारी घेतल्याजात होती तसलं सौजन्य दाखविल्या जात नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73133 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71199 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या 44 रूग्णांमध्ये 16 महिला व 28 पुरूष असून वणी शहरात गुरूनगर परिसरातील 58 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
वणी: बातमीदार