● शिरपूर पोलिसांची कामगिरी
वणी: घरातील लोखंडी कपाटात पैसे ठेऊन शेतात कामाला गेले असता चोरट्याने 19 हजार रुपये लंपास केले होते. तक्रार दाखल होताच अवघ्या 48 तासात शिरपूर पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुनवट या गावातील अमोल गजानन पिदुरकर यांनी बँकेतून आणलेले 5 हजार रुपये घरात असलेल्या लोखंडी कपाटात ठेवले होते. पूर्वीचे 14 हजार व 5 हजार असे एकूण 19 हजार रुपये कपाटात ठेवण्यात आले होते.
अमोल पिदूरकर यांच्या आई पैसे कपाटात ठेऊन घराला कुलूप न लावता दि 6 जानेवारीला शेतात गेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने याचाच फायदा घेत कपाटातील 19 हजार रुपये लंपास केले होते.
या बाबत शिरपूर पोलिसात तक्रार दाखल होताच ठाणेदार गजानन करेवाड यांनी तपासाला सुरवात केली. त्याच दिवशी गावातील गणपत मधुकर सुर (30) हा त्यांचा घरात गेला होता अशी माहिती मिळताच त्याला ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखवताच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे जवळून 17 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, प्रमोद जुनुनकर, सुनिल दुबे, अभीजीत कोषटवार, गजानन सावसाकडे यांनी केली आहे.
वणी: बातमीदार