Home क्राईम विकृत….वासनांध सासऱ्याचा सूनबाई वर अत्याचार

विकृत….वासनांध सासऱ्याचा सूनबाई वर अत्याचार

828
Img 20240613 Wa0015

नात्याला फासली काळिमा
पोलिसात गुन्हा नोंद, आरोपीला अटक

वणी: दिवाळी निमित्ताने माहेरी आलेल्या सूनबाई (30)ला घ्यायला आलेल्या सासऱ्यानेच (59) सर्व मर्यादा ओलांडत विकृतीचा कळस गाठला. घरी कोणीच नसल्याची संधी साधून वासनांध सासऱ्याने चक्क सूनबाई वरच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उजागर झाली. त्या पीडितेच्या आई ने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वणीत वास्तव्यास असलेल्या मुलीचे लग्न बल्लारपूर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या रामपाल (बदललेले नाव) सोबत 2016 मध्ये झाले होते. ती दिवाळी निमित्ताने वणीत आली होती. बरेच दिवस झाले तरी ती सासरी परतली नसल्याने सासरा शामलाल (बदललेले नाव) तीला सासरी घेऊन जाण्यास दि. 6 जानेवारीला वणीत आला होता.

शुक्रवारी पीडितेचे आई व वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी साधून वासनांध शामलालने तिला बळजबरीने खोलीत नेऊन अत्याचार केला. या दरम्यान पीडितेची आई घरी परतली असता दुष्कर्म करीत असलेला सासरा रंगेहात सापडला. घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या शामलाल ने तडक आपले गाव गाठले.

शुक्रवार दि. 7 जानेवारीला घडलेल्या या गंभीर घटनेची वणी पोलिसात 9 जानेवारीला तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपीविरुद्द कलम 376 (2)(F)(N) व 506 अनव्ये गुन्हा नोंद केला.

आरोपी सासऱ्याला अटक करण्यासाठी पोलीसांचे पथक रविवारी रात्रीच बल्लारशाह येथे गेले होते. त्याच्या गावावरून वासनांध सासरा शामलाल याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
वणी: बातमीदार