Home Breaking News वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांना ‘पितृशोक’

वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांना ‘पितृशोक’

224

रामदासजी भोयर यांचे निधन
गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार

वणी: वंचित बहुजन आघाडीचे वणी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे वडील रामदासजी मारोतीराव भोयर यांचे अल्पशा आजाराने झरी जामनी तालुक्यातील मुकूटबन येथे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.

रामदास भोयर हे शेतकरी होते त्यांचा मोठा जनसंपर्क होता. वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा त्यांची प्रकृती ठणठणीत होती. गुरुवारी पहाटे अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

ते पत्रकार तसेच वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे वडील असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.त्यांचेवर मुकूटबन येथील मोक्षधामात दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार