Home विदर्भ संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी ‘नयन लुंगे’

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी ‘नयन लुंगे’

155

● प्रविणदादा गायकवाड यांनी केली नियुक्ती

यवतमाळ: मराठा सेवासंघ प्रणीत संभाजी ब्रिगेड च्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नयन लुंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणा-या नयन यांची थेट यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने यवतमाळ जिल्हयात आनंद व्यक्त केल्या जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासुन संभाजी ब्रिगेड ही संघटना राज्यात सामाजिक कार्य करीत आहे. मोठया संख्येतील तरुण या संघटनेत कार्यरत आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड तसेच प्रदेश महासचिव सुभाष बोरकर हे नुकतेच यवतमाळ येथे आले होते.

याप्रसंगी त्यांनी सामाजिक कार्यातील योगदान बघून नयन लुंगे यांना यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. या संदर्भातील नियुक्ती पत्र प्राप्त होताच संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संभाजी ब्रिगेडचा नावलौकीक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नयन लुंगे यांनी दिली.

विशेष म्हणजे नयन हे गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवक म्हणून काम करतात. ग्रामीण भागातील नागरीकांना उपचारादरम्यान काही अडचणी आल्यास मदत करतात. कोरोना काळात त्यांनी अन्नदान, सुरक्षा किटचे वाटप केले होते. त्यांच्या या नियुक्तीचे यवतमाळ येथील नागरीकांनी स्वागत केले आहे.

●अन्याय झाल्यास संपर्क करावे ●
संभाजी ब्रिगेड ही अन्यायाच्या विरोधात लढणारी संघटना आहे. राज्यातील कुठल्याही नागरीकांवर झालेला अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. जिल्हयातील नागरीकांनी अन्याय झाल्यास अथवा कुठलीही अडचण भासल्यास संभाजी ब्रिग्रेडच्या पदाधिका-यांसोबत संपर्क करावा असे आवाहन नव नियुक्त जिल्हाध्यक्षांनी केले.
वणी: बातमीदार