Home Breaking News भीषण….वरोऱ्यात ट्रॅव्हल्स व ट्रकचा विचित्र अपघात

भीषण….वरोऱ्यात ट्रॅव्हल्स व ट्रकचा विचित्र अपघात

4188

दोन ठार झाल्याची माहिती
रत्नमाला चौकात घडली घटना

वणी: वरोऱ्यातील रत्नमाला चौकातील लगान बार जवळ भरधाव ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला भीषण धडक दिली. या विचित्र अपघातात दोघांच्या मृत्यू सह काही प्रवाशी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

चंद्रपूर ते नागपूर हा महामार्ग प्रचंड वर्दळीचा आहे. या मार्गावरून अनेक खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाश्यांची ने-आन करीत असतात. त्याच बरोबर अनेक अवजड वाहने या मार्गाने मार्गक्रमण करतात. या मार्गावर लहानसहान अपघात नित्याचेच झाले आहे.मात्र आज झालेल्या भीषण अपघाताने वरोरा शहर हादरले आहे.

रामायण ट्रॅव्हल्स कंपनीची बस नागपूर वरून प्रवाशी घेऊन चंद्रपूर ला जात असताना शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स ने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ला जबर धडक दिली. या विचित्र अपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे तर काही प्रवाशी जखमी झाले आहेत.

सायंकाळी वरोरा शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या भीषण अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासन घटनास्थळावर पोहचले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
वणी: बातमीदार