● जिल्ह्यात 66 महिला व 134 पुरूष बाधित
● 56 कोरोनामुक्त तर एक मृत्यू
वणी : कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. प्रशासन सतर्क झाले असून कोविड त्रिसूत्रीचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन करण्यात येत आहे. बुधवार दि. 19 जानेवारीला जिल्ह्यात 66 महिला व 134 पुरूष बाधित आढळलेत. यात वणी तालुक्यातील 9 तर जिल्ह्यात 200 कोरोना “पॉझिटिव्ह” निष्पन्न झालेत.
संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 200 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 56 जण कोरोनामुक्त झाले असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 881 व बाहेर जिल्ह्यात 23 अशी एकूण 904 झाली असून त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 863 गृहविलगीकरणात आहेत.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या 200 रूग्णांमध्ये 66 महिला व 134 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात 16, बाभुळगाव सहा, दारव्हा एक, दिग्रस चार, घाटंजी 11, कळंब 13, महागाव एक, मारेगाव दोन, नेर 39, पांढरकवडा 29, पुसद पाच, राळेगाव 11, उमरखेड दोन, वणी नऊ, यवतमाळ 40, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील 10 रूग्णांचा समावेश आहे.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
वणी : बातमीदार