Home Breaking News खळबळ… वणीत मानवी “सांगाडा” आढळला

खळबळ… वणीत मानवी “सांगाडा” आढळला

3139

पुरुष की महिला तपास सुरू
घटनास्थळी बघ्यांची गर्दी

वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात मानवी सांगाडा आढळल्याने शुक्रवारी सकाळी प्रचंड खळबळ माजली आहे. पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून ‘तो’ मानवी सांगाडा पुरुषाचा की महिलेचा हे तपासाअंती उघड होणार आहे.

वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरातील चौपाटी बार नजीक असलेल्या पारखी यांच्या शेताजवळ सकाळी मानवी सांगाडा आढळून आला. प्रत्यक्षदर्शींनी या बाबत परिसरातील नागरिकांना सांगितले तसेच पोलिसांना सूचित करण्यात आल्याने ठाणेदार शाम सोनटक्के यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

आढळून आलेला मानवी सांगाडा कुणाचा आणि प्रकरणाचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. तसेच हा सांगाडा स्त्री की पुरुषाचा हे तपासाअंती निष्पन्न होणार आहे.
वणी: बातमीदार