● नागरिक बेसावध, कोविड सेंटर ची गरज
वणी: शहरात पालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या माध्यमातून प्रचार व कारवाई राबवली आहे मात्र “ये रे माझ्या मागल्या” अशी स्थिती आहे. शनिवारी आरोग्य विभागाला प्राप्त अहवालात तब्बल 27 कोरोना बाधित आढळल्याने रुग्ण वाढीचा आलेख 40 टक्क्यांनी वाढला आहे. नागरिक बेसावध असल्याची ही फलश्रुती असून कोविड सेंटर ची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. बाजारपेठेतील गर्दी आणि कोविड नियमाचे पालन होतांना दिसत नाही. वणीकर नागरिक बिनधास्त वावरताहेत, कोविड त्रिसूत्रीचे पालन पूर्णतः विसरलेत. भीती आणि पूर्वीची दहशत सध्यस्थीतीत दिसत नाही.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत झालेली वाताहत तिसऱ्या लाटेत होऊनये या करिता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. परंतु आर्थिक अस्थिरता आणि पोहचलेली झळ नागरिक विसरले नाहीत. यामुळे कदाचित ‘जे होईल ते बघून घेऊ’ अशी मानसिकता तर तयार झाली नाही ना ! या बाबत प्रशासनाने संशोधन करणे गरजेचे झाले आहे.
संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात जिल्ह्यात 368 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते तर शनिवारी 309 कोरोना बाधित आढळले आहेत. दोन दिवसात 677 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तर वणीत हा यावर्षीचा सर्वात मोठा आकडा असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
वणी: बातमीदार