Home Breaking News सावधान….वणीत 17 तर जिल्ह्यात 456 “पॉझिटिव्ह”

सावधान….वणीत 17 तर जिल्ह्यात 456 “पॉझिटिव्ह”

646
Img 20241016 Wa0023

जिल्ह्यात 151 महिला व 305 पुरूष बाधित
253 कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू

वणी : कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. प्रशासन सतर्क झाले असून कोविड त्रिसूत्रीचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन करण्यात येत आहे. बुधवार दि. 26 जानेवारीला जिल्ह्यात 151 महिला व 305 पुरूष बाधित आढळलेत. यात वणी तालुक्यातील 17 तर जिल्ह्यात 456 कोरोना “पॉझिटिव्ह” निष्पन्न झालेत. तर आज मृत झालेल्यांमध्ये बाजोरीया नगर, यवतमाळ येथील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्ह्यात 456 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 2039 व बाहेर जिल्ह्यात 31 अशी एकूण 2070 झाली असून त्यातील 91 रूग्ण रूग्णालयात तर 1979 गृहविलगीकरणात आहेत.

बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या 456 रूग्णांमध्ये 151 महिला व 305 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात चार, बाभुळगाव 26, दारव्हा 21, दिग्रस 49, घाटंजी 21, कळंब 11, नेर 53, पांढरकवडा 44, पुसद 30, राळेगाव आठ, उमरखेड एक, वणी 17, यवतमाळ 160, झरी जामणी पाच व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
वणी : बातमीदार