Home Breaking News वणीत आयजी च्या पथकांची कारवाई.. अनेक वरली मटका अड्डयावर धाडी

वणीत आयजी च्या पथकांची कारवाई.. अनेक वरली मटका अड्डयावर धाडी

1883

  आय.जी च्या पथकाची कारवाई

वणी :- शहरातील दीपक टॉकीज, एकता नगर व जुन्या बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षक अमरावती यांच्या पथकाने धाडसत्र अवलंबले. यावेळी मटका व्यावसायिक व जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

वणी परिसर हा आर्थिक दृष्ट्या संपन्न असा परिसर आहे. त्यामुळे या परिसरात अवैध धंदे डोके वर काढतांना दिसत आहे. वणी पोलिसांनी अनेकदा या व्यावसायिकांवर कारवाया केल्या आहे. तरी देखील लपूनछपून हे व्यावसायिक आपले मनसुबे पूर्णत्वास नेत आहे.

एका आठवड्यापूर्वी ठाणेदार श्याम सोमटक्के यांनी दुचाकीने जाऊन सिंधी कॉलनी येथे मटका अड्डयावर धाड केली होती. दि 29 जानेवारीला दुपारी 4 वाजताचे सुमारास पोलीस उप महानिरीक्षक अमरावती यांचे पथक शहरात दाखल झाले.

त्यांनी एकाच वेळी एकता नगर, जुने बस स्थानक व दीपक टॉकीज परिसरात सुरू असलेल्या मटका अड्डयावर धाड टाकून अनेकांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सिंधी कॉलनीतील एका दुकानातून प्रतिबंधित मजा तंबाखूचे डब्बे जप्त करण्यात आले आहे. वृत्त लिहे पर्यंत कारवाई सुरू असल्याने किती जणांना ताब्यात घेतले व किती मुद्देमाल जप्त करण्यात आला याची माहिती मिळू शकली नाही.

वणी : बातमीदार