Home Breaking News नेरड शिवारात वाघाचा वावर, गायीचा पडला फडशा

नेरड शिवारात वाघाचा वावर, गायीचा पडला फडशा

578
Img 20250630 wa0035

शेतकरी शेतमजूर भयभीत

वणी :- गेल्या अनेक महिन्या पासून तालुक्यात वाघाचा वावर आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरे वाघाने ठार केली आहे. नेरड येथील शेतात बांधून असलेली गाय वाघाने ठार केल्याने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Img 20250630 wa0037

तालुक्याला लागूनच असलेल्या टिपेश्वर अभयारण्यतुन वाघ तालुक्यात येतात. गेल्या काही महिन्यांपासून कायर, नेरड, रासा, घोन्सा, सुकनेगाव व उकणी, निलजई या वेकोलीच्या क्षेत्रात वाघाचा वावर दिसून येत आहे.

Img 20250103 Wa0009

वाघाने आत्ता पर्यंत अनेक जनावरांचा फडशा पडला आहे. नेरड येथील शेतकरी अजय कुचनकर यांनी आपली गाय शेतात बांधून ठेवली होती. दि 29 जानेवारीला च्या मध्यरात्रीला वाघाने हल्ला करून गाईला ठार केले.

सकाळी कुचनकर हे शेतात बांधून असलेली गाय सोडण्यास गेले असता वाघाने गाईला ठार केल्याचे दिसून आले. याबाबत शेतकऱ्याने वन विभागाला माहिती दिली आहे. परिसरात वाघाचा वाढता वावर हा शेतकरी व मजुरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
वणी: बातमीदार