Home Breaking News मांजा’ मुळे विद्यार्थीनीचा गळा चिरला

मांजा’ मुळे विद्यार्थीनीचा गळा चिरला

546

15 हजाराचा चिनी मांजा जप्त

वणी : संक्रातीच्या काळात पतंग उडविण्याचा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळल्या जातो. यासाठी घातक प्रकारात मोडणाऱ्या चिनी मांज्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्यामुळे या मांज्याचा उपयोग करून पतंग उडवीत असतांना येथील एका विद्यार्थीनीचा गळा या मांज्याने चिरला आहे.

या घटनेची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही. चिनी मांज्याची विक्री होत असल्याची माहिती मिळल्यावरून वणी पोलिसांनी कार्यवाही करून 15 हजार रुपयाचा ‘मांजा’ पोलिसांनी जप्त केला आहे.

मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविली जाते. आकाशात पतंग उडवून दोन पतंगी मध्ये कट लावल्या जाते. या करिता बंदी असलेल्या चिनी मांजाचा उपयोग केल्या जातो. या मांजामुळे अनेक पक्षी जखमी होताt तर कित्येक पक्षाचा जीव देखील जातो. त्यामुळे पक्षी प्रेमींनी या मांजावर बंदी आणण्याची मागणी केली होती. या जीवघेण्या मांजावर बंदी आणण्यात आली आहे.

शहरातील काही व्यावसायिक बिनधास्त पतंगासह मांजा विक्रीचा व्यवसाय करीत आहे. दि 5 फेब्रुवारीला जैन लेआऊट परिसरात राहणारी एक विद्यार्थिनी शिकवणी वर्गाला दुचाकीवरून जातांना मांजा गळ्यात अडकूल गळा चिरला. उपचारादरम्यान तिच्या गळ्याला चार टाके सुद्धा बसले.

शहरातील भारत माता चौकात मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी या दुकानावर धाड टाकून चेतन अशोकचंद बोहरा याला ताब्यात घेऊन 15 हजार रुपये किमतीचा चिनी मांजा जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे करीत आहेत.
वणी: बातमीदार