● नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन
वणी : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवार दि. 6 फेब्रुवारी ला निधन झालं. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. त्यांना आज 7 फेब्रुवारी ला दुपारी चार वाजता वणीकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे वर मुंबई येथील रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्राण ज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने जगाला भुरळ घातली होती. अशी महान गायिका पुन्हा होणे नाही.
येथील प्रभू श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता येथील शिवाजी पुतळ्या समोर दुपारी चार वाजता वणीकरांनी श्रद्धांजली वाहण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन रवी बेलूरकर यांनी केले आहे.
वणी: बातमीदार