Home Breaking News आमदार ससाने अडचणीत, अंतरिम जामीन अर्ज प्रलंबित..!

आमदार ससाने अडचणीत, अंतरिम जामीन अर्ज प्रलंबित..!

1575

नियमबाह्य लाखोंची देयके काढल्याचा ठपका

उमरखेडवसंत देशमुख : घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये 65 लाखाचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान आमदार नामदेव ससाने यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात अंतरिम जामीन प्रलंबित असल्याने आमदार ससाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुढील सुनावनी 11 फेब्रवारी ला असल्याने  नेमका काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट या शहर स्वच्छते बाबतच्या महत्वपूर्ण कार्यात तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव ससाने यांचेसह तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, कंत्राटदार फिरोजखान आजाद खान, मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे यांच्यासह लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव असे एकूण अकरा जणांविरुद्ध कचरा संकलन घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.

शहर स्वच्छते बाबतच्या महत्वपुर्ण योजनेतच “कचरा घोटाळा” करणाऱ्यांच्या विरोधात नगरविकास मंत्रालयाने कठोर निर्णय घेत जिल्हाधिकारी यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तात्काळ दखल घेत विद्यमान मुख्यधिकारी यांनी पोलिसात तक्रार दाखल करावी असे आदेश पारित केले होते.

रविवार दि 6 फेब्रुवारी ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली. सोमवारी ठाणेदार अमोल माळवी यांनी घटनेचे गांभीर्य बघता व दस्तऐवजाची पडताळणी करून भादवी 420, 409, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हे दाखल केले होते.

पोलिसात गुन्हे दाखल होताच आ. ससाने यांनी अंतरिम जामीन मिळावा याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवार दि. 9 फेब्रुवारी ला जिल्हा व सत्र न्यायालय पुसद येथे सुनावणी झाली नाही यामुळे अंतरींम जामिन अर्ज प्रलंबित आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी दि.11 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने आमदार ससाने यांच्या अडचणीत वाढ झाली असून पुढे काय होणार याकडे उमरखेड मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उमरखेड: बातमीदार