Home Breaking News प्राध्यापकाचा मृत्यू कशाने झाला पहा, आरोपींवर कलम लागली तीनशे सहा…!

प्राध्यापकाचा मृत्यू कशाने झाला पहा, आरोपींवर कलम लागली तीनशे सहा…!

5400

पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

उमरखेडवसंत देशमुख : उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगांव येथील तेजमल गांधी ज्यूनियर कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या 37 वर्षीय प्रधायपकाने मंगळवार दि. 15 फेब्रुवारीला गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत्तकाच्या बहिणीने केल्यामुळेच पोलिसांनी पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल दाखल केला आहे.

संदिपान खंदारे (37) असे मृतक प्राध्यापकांचे नाव आहे. ते नांदेड येथे वास्तव्यास होते त्यांचे तालुक्यातील कृष्णापूर येथील स्नेहल अनंतराव गायकवाड हिचे सोबत रितिरिवाजानुसार 2019 मध्ये लग्न झाले होते. काही दिवस संसार सुखाचा चाललेला असताना सासु सासऱ्यांशी पटत नसल्याच्या कारणाने स्नेहल व तिचे नातेवाईक नेहमीच पती संदीपान सोबत वाद घालत होते.

सातत्याने मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने संदिपान याने राजेश नगर, नांदेड येथील आपल्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी 11 वाजता गळफास लावून जीवनयात्रा संपवली. मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी मुलगा वेदांत उद्देशून लाल रंगाच्या रजिस्टरमध्ये विस्तृत विवरण लिहून ठेवले.

आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत संदीपान यांनी गळफास घेऊन आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट करत तुझ्या आईने व तिच्या नातेवाईकांनी तुझ्या पप्पाला तुझ्यापासून हिरावले असे नमूद केले असून ‘माझ्या मृत्यूस तुझ्या आईसह 5 जण जबाबदार आहेत, त्यांना तु सोडू नको असा लेखी उल्लेख केला आहे’.

या प्रकरणी मृत्तक संदिपान याची बहीण रंजना अमोल यादव रा. धामनेर ता. कोरेगाव जि. सातारा हिने नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारींवरून पोलीसांनी पत्नी स्नेहल आनंदराव गायकवाड, सासू गोदावरी गायकवाड, सासरा आनंदराव गायकवाड, प्रथमेश गायकवाड, नम्रता गायकवाड सर्व रा. उमरखेड यांचे विरुद्ध भादंवि 306, 323, 504, 506 नुसार नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरखेड: बातमीदार