● शिरपूर देवस्थानचा निर्णय
● केवळ दर्शन घेता येणार
वणी:– तालुक्यातील शिरपूर येथे महाशिवरात्री निमित्याने भरण्यात येणारी यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. भक्तांना केवळ दर्शन घेता येणार असल्याचे कैलास देवस्थान समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पुढील महिन्यात महाशिवरात्री आहे, शिरपूरला कैलास शिखरावर भव्य स्वरूपात यात्रा भरविण्यात येते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात भाविकांची मांदियाळी असते. यात्रेला परिसरातील हजारो नागरिक हजेरी लावतात. मात्र कोरोना मुळे गेल्या दोन वर्षां पासून देवस्थाने बंद असल्याने भक्तांचा हिरमोड झाला होता.
देवस्थान परिसरात कुठल्याही प्रकारचे दुकाने लावता येणार नाही. केवळ कोरोना नियम पाळून भक्तांना रांगेत दर्शन घेता येणार आहे अशी माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने आता निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यावर्षी शिरपूर येथील प्रसिद्ध असलेली यात्रा भरणार अशी आशा भक्तांना होती. मात्र याही वर्षी यात्रा न भरवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.
वणी: बातमीदार