Home वणी परिसर शिवजयंती चे औचित्य साधून ‘निराधार सेवा सप्ताह’

शिवजयंती चे औचित्य साधून ‘निराधार सेवा सप्ताह’

314

वंचित व श्रीगुरुदेव सेना यांचा संयुक्त उपक्रम

वणी : वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात निराधार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

निराधार सेवा सप्ताह अंतर्गत ग्रामपंचायत ढाकोरी (बोरी) येथे 20 फेब्रुवारी ला मोफत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग उपस्थित होते.

ढाकोरी (बोरी) येथील शिबिरात 21 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. सरपंच अजय कवरासे, बोरीचे सरपंच योगीराज आत्राम, गोवारी पारडी चे सरपंच नरेंद्र बदखल, चंपत पाचभाई, विठ्ठल ठाकरे, दिवाकर काळे, महेंद्र काकडे, दिवाकर कवरासे, हरीचंद्र मडावी, भास्कर वासेकर, पंकज मांडवकर यांनी परिश्रम घेतले.

निराधार सेवा सप्ताहाचे 24 तारखेला मोहदा, 26 ला सावंगी तर 27 फेब्रुवारी ला येणक येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व निराधारांनी उपस्थित राहण्याचे आव्हान वंचितच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार