Home Breaking News थरार…. वणीचा सुपुत्र ‘अभिनयन’ युक्रेन मध्ये अडकला

थरार…. वणीचा सुपुत्र ‘अभिनयन’ युक्रेन मध्ये अडकला

3432

MBBS च्या प्रथम वर्षात शिकतोय

वणी: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा युद्धजन्य स्थिती जैसे थे आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. वणीचा सुपुत्र अभिनयन राम काळे हा MBBS च्या प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी अडकल्याने त्याला तातडीने आपल्या देशात आणावे याकरिता प्रशासनाने प्रयत्न करावे असे आर्जव त्याच्या परिवाराने केले आहे.

अभिनयन राम काळे हा विद्यार्थी आपल्या परिवारासह वणीतील गुरू नगर परिसरात वास्तव्यास आहे. तो वैद्यकीय शिक्षणा करिता एक महिन्यांपूर्वी युक्रेन ला रवाना झाला होता. तो Bukovinion state Medical University Higher educational Institution chernivtsi, Ukraine येथे MBBS प्रथम वर्षात शिकतोय.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. याकरिता संपूर्ण राज्यातील प्रशासनिक अधिकाऱ्यांना आदेशीत करत युक्रेन मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ जिल्हयातील ज्या नागरिकांचे नातेवाईक युक्रेन या देशामध्ये अडकले आहेत अशा नागरिकांनी त्याबाबतची माहीती जवळच्या तहसिल कार्यालय किंवा पोलिस नियंत्रण कक्षाला द्यावी असे आवाहन केले होते.

जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानंतर अभिनयन काळे यांचे काका काशिनाथ वारलुजी काळे (61) यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन आपल्या पाल्या बाबत विस्तृत माहिती दिली आहे. पारिवारिक मंडळी अभिनयन च्या संपर्कात असून तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
वणी: बातमीदार