Home Breaking News एसटी चालकास ‘मारहाण’, कामावर येण्यासाठी तगादा

एसटी चालकास ‘मारहाण’, कामावर येण्यासाठी तगादा

1273

वणी आगारातील घटना

वणी : गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. तर कामावर का येत नाही या कारणावरून वणी आगारातील एका चालकास मारहाण करण्यात आली या प्रकाराने भयभीत झालेल्या चालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एस टी महामंडळा चे विलगिकरण करण्यात यावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मागण्या पूर्ण होई पर्यंत कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळा चे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

महाराष्ट्र शासना कडून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. मात्र कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

वणी आगारातील काही कर्मचारी कामावर रूजु झाल्याने काही बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र काही कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहे. वणी आगारात कामावर येण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्या जात असल्याचे प्रकार सुरू आहे.

दि 27 फेब्रुवारी ला संपावर असलेले चालक दिलीप आत्राम हे चौकशी कार्यालया समोर उभे असतांना अंकुश पाते व महादेव मडावी हे तिथे आले आणि तू कामावर येत नाही म्हणून वाद घातला व मारहाण केली या प्रकरणी आत्राम यांनी वणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी या दोघा विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
वणी: बातमीदार