Home Breaking News धक्कादायक… नराधमाचा दोन चिमुकल्यांवर अत्याचार

धक्कादायक… नराधमाचा दोन चिमुकल्यांवर अत्याचार

2752

खाऊचे आमिष देत केले बीभत्स कृत्य

उमरखेड: चाळीस वर्षीय नराधमाने कुठलेही भान न ठेवता दोन चिमुकल्या मुलीवर पैशाचे आमिष देत पाशवी अत्याचार केला. समाजमन सुन करणारी ही बिभत्स घटना तालुक्यातील एका खेड्यात सोमवार दि. 28 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घडलेल्या घटनेने प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

बालाजी ऊर्फ बाळू श्यामराव भोळे (40) असे त्या नराधमाचे नाव असून तो साखरा या गावातील निवासी आहे. घटनेच्या दिवशी पीडित बालिकेचे आई-वडील शेतात कामासाठी गेले होते तर ती सहा वर्षीय बालीका आपल्या चार वर्षीय मैत्रिणी सोबत अंगणात खेळत होती. तेवढ्यात नराधम बाळूने खाऊचे (पैशाचे) आमिष देत त्या दोघींना घरात बोलावले.

त्या विकृत नराधमाने दोन्ही चिमुरड्याना घरात घेत दरवाजा बंद केला. आणि कुठलेही भान न ठेवता त्या दोन्ही चिमुकल्यांवर पाशवी अत्याचार केला. ही बाब त्या पीडित चिमुकलीच्या दोन वर्षाने मोठा असलेल्या भावाच्या लक्षात आली त्याने या बाबत आजीला सांगितले.

पीडितेची आजी थेट नराधम बाळूच्या घरी गेली यावेळी तिने घराचे दार ठोठावले. मात्र कुणाचाही आवाज आला नाही त्यानंतर तिने त्या दोन्ही चिमुकल्यांची नावे घेत जोर जोराने हाका मारल्या. मात्र तरीही चिमुकल्या मुली बाहेर आल्या नाहीत त्यामुळे गैरसमज झाला समजून आजी परत घराकडे निघाली असता काही वेळातच त्या दोन्ही मुली बाळू च्या घरातून बाहेर आल्या.

मुलींना बघताच आजी आणि शेजारी राहणाऱ्या महिलांनी त्या दोघींना विचारणा केली. परंतु घाबरलेल्या चिमुकल्यांनी काहीच सांगितले नाही. मात्र त्यानंतर थोड्या वेळाने दोघींनीही घडलेला प्रकार कुटुंबीयांकडे कथन केला. त्यानंतर नाराधम बाळूची दोन्ही कुटुंबीयांनी शोधाशोध केली मात्र तो पसार झाला होता.

घडलेली घटना समाजमन सुन्न करणारी असल्याने दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी पीडित चिमुकल्यांना सोबत घेत उमरखेड पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी संयुक्त तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी पीडित दोन्ही बालिकांचे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला आहे.

पोलिसांनी नराधम बाळू भोळे याच्या विरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून सदर प्रकरणाचा तपास पीएसआय नारायण पांचाळ, बीट जमादार संतोष चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत.
उमरखेड: बातमीदार