Home Breaking News थरार….वाघ आणि युवक दहा मिनिटे ‘आमनेसामने’

थरार….वाघ आणि युवक दहा मिनिटे ‘आमनेसामने’

4674

ब्राम्हणी गावावरून परतताना घडली घटना

वणी: तालुक्यात वाघाचा मुक्तसंचार सुरू आहे, पशुधनावरील हल्ले नित्याचेच असताना आता ग्रामस्थांना होणारे वाघ्रदर्शन चिंतेचा विषय झाला आहे. बुधवार दि. 9 मार्चला पहाटे 6 वाजताच्या दरम्यान ब्रेड वाटप करून गावी परतणाऱ्या सायकल स्वाराच्या अगदी समोर वाघ उभा ठाकला. गर्भगळीत झालेला युवक व वाघ तब्बल दहा मिनिटे आमनेसामने होते.

मंगेश रमेश हनुमंते (26) हा तालुक्यातील निळापूर येथील निवासी आहे. भल्या पहाटे आजूबाजूच्या गावी ब्रेड विकण्याचा व्यवसाय करतो. त्यावर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असून ब्रेड विकणे हाच नित्यक्रम असल्याने तो नेहमीप्रमाणे सायकलने ब्राम्हणी गावात गेला होता.

बुधवारी सकाळीच मंगेश, ब्राम्हणी गावात पोहचला. ब्रेड विकून आपल्या गावी परतत असताना मुरुमाची डम्पिंग असलेल्या मार्गावर अचानक वाघ समोर, या अकस्मात घडलेल्या प्रकारामुळे त्याला काय करावे हेच सुचत नव्हते. वाघ अगदी पाच मीटर अंतरावर असल्याने घरी पोहचतो की नाही अशी अवस्था झाली होती. डोळ्यात अश्रुधारा आणि सायकलच्या मुठी वरील थरथरणारे हात.

मंगेश, च्या आयुष्यातील सर्वात भीषण प्रसंग, समोर वाघ आणि पाठ दाखवली तर होणारा हल्ला यामुळे त्याने जीव मुठीत घेऊन वाघाच्या जाण्याची वाट पाहिली. काही वेळाने वाघ गोवारी गावाच्या बाजूने पाणी असलेल्या गड्ड्यात हळूच उतरला आणि मंगेशचा मार्ग मोकळा झाला.

तालुक्यात वाघाचा सातत्याने होत असलेला वाघाचा मुक्तसंचार ग्रामस्थांसाठी धोकादायक आहे. मात्र वनविभाग यावर कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. तालुक्यात ठिकठिकाणी वाघ्रदर्शन होत आहे. आजची घटना अतिशय थरारक असून संबंधित विभागाने निव्वळ स्वहितार्थ योजना राबविणे भविष्यात धोकादायक ठरणार आहे.
वणी: बातमीदार