Home वणी परिसर त्या…रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम करा..!

त्या…रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम करा..!

483

माजी नगरसेविका रंजू झाडे आक्रमक

वणी: प्रभाग 2 मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंजूर झालेल्या रस्त्याचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडले आहे. नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो आहे. तातडीने डांबरीकरण करावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असे निवेदन माजी नगरसेविका रंजू झाडे यांच्या नेतृत्वात स्थानिकांनी SDO यांना दिले आहे.

प्रभाग क्रमांक 2 मधून शंकर मंदिरापासून वडगाव रोड कडे जाणारा रस्ता अपूर्णावस्थेत आहे. या मार्गाच्या डांबरीकरणाला दोन वर्षांपूर्वी च मंजुरात मिळाली आहे. त्या रस्त्याचे प्राथमिक काम करून सोडून देण्यात आले आहे. रस्त्यावर विखुरलेल्या गिट्टी मुळे लहानसहान अपघात नित्याचेच झाले आहे. दुचाकीस्वार महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना मार्गक्रमण करताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहे.

या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्र व्यवहार करूनही ते लक्ष देत नसल्याने आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागत असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन दिल्यापासून सात दिवसाच्या आत डांबरीकरण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने स्थानिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी मंदा ढाकुलकर, कांता काकडे, रामदास नगराळे, उषा मडावी, एम. के. उंबरकर, बेबी उगे, सीमा नगराळे, आयुब खान, श्रुती उपाध्ये, वसुधा ढगे, निशा पाटील, अर्चना हाते यांचेसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वणी बातमीदार