Home Breaking News दणका….सरपंच पदावरून व्हावे लागेल ‘पायउतार’

दणका….सरपंच पदावरून व्हावे लागेल ‘पायउतार’

1430

जात वैधता प्रमाणपत्र अवैध

उमरखेडवसंत देशमुख: राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपुर्व असलेल्या ग्रामपंचायत चातारी येथील सरपंच रंजना संतोष माने यांचा कुणबी इतर मागासवर्गीय या जातीचा दाखला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी अवैध ठरवलेला आहे. यामुळे आता..त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याने पंचक्रोशीत चांगलीच खळबळ माजली आहे.

तालुक्यातील मतखंडात राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या चातारी गावातील राजकारण ‘लयभारी’ असल्याचा प्रत्यय अनेक गाव पुढाऱ्यांना येत असतो. येथील ग्रामपंचायत चे सरपंच पद इतर मागासवर्गीय महिला (ओबीसी) साठी राखीव होते. त्यासाठी सदर प्रवर्गा मधून रंजना संतोष माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सरपंचपदी आरूढ झाल्यात.

सरपंच माने यांनी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जोडलेल्या जातीच्या दाखल्यावर चंद्रकला अशोक हामंद यांनी आक्षेप घेत जात पडताळणी समिती कडे रीतसर तक्रार दाखल केली. यावर जात पडताळणी समितीने सरपंच माने यांना सबळ पुरावे सादर करण्यास सांगितले होते. परंतु त्या सबळ पुरावे सादर करू शकल्या नाहीत. त्यामुळे आठ मार्च ला त्यांचा कुणबी इतर मागासवर्गीय या जातीचा दावा अवैध ठरविण्यात आला.

उपविभागीय अधिकारी पुसद यांनी दिलेले जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवण्यात आले आहे. तसेच जातीचा दाखला जमा करून रद्द करण्याची कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा जात पडताळणी समितीने जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांना माहीतीस्तव तथा पुढील कार्यवाहीस्तव अग्रेसीत केले आहे. यामुळे सरपंच पदावर गंडांतर येणार असून माने यांचेवर पायउतार होण्याची वेळ आली आहे.

चातारी हे गाव राजकीय दृष्ट्या बहुचर्चित असले तरी त्या गावात ओबीसी समाजातील सुतार, लोहार, कुंभार, सोनार, तेली, वंजारी, मुन्नरवार या जातीची संख्या निर्णायक आहे. असे असतांना देखील मराठा बहुल प्रवर्गातील महिलेने फक्त सरपंच पदाच्या लालसेपोटी ईतर मागास वर्गातुन साखरा हे माहेर असतांना पळशीचा खोटा पुरावा जोडल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले. मात्र त्यांना हे कारस्थान करण्यास भाग पाडणाऱ्या राजकीय व सामाजीक क्षेत्रातील विद्वानाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उमरखेड: बातमीदार