● महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार
वणी :- आज तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. संपूर्ण देशात उत्साहाने जयंती साजरी केली जाते. यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी शिवजयंती साजरी करण्याकरिता पुढाकार घेतला आहे.
शहरात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या सभोवताल सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी महाराजांचा अभिषेक करण्यात येणार आहे. तर सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करून मान्यवरांच्या हस्ते हारार्पण केले जाणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवतीर्थावर उपस्थिती राहावे असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार