Home वणी परिसर युवकांनी भगतसिंगांचे विचार आत्मसात करावेत..!

युवकांनी भगतसिंगांचे विचार आत्मसात करावेत..!

357

शहीद दिनानिमित्त राजूर येथे अभिवादन

वणी : शोषण विरहित समाजव्यवस्थेचे स्वप्न बाळगून त्या दिशेने कृती करणारे महान क्रांतिकारी शहीद भगतसिंग व त्यांचे साथीदार सुखदेव व राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त राजूर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन राजूर विकास संघर्ष समितीने केले होते.

महापुरुष किंवा क्रांतिकारकांना निव्वळ अभिवादन करून चालणार नाहीतर त्यांनीं सांगितलेल्या मार्गावर चालल्याने परिवर्तन घडवून आणता येईल तरच खऱ्या अर्थाने त्यांचे गुणगौरव केला असे म्हणता येईल. अत्यंत खडतर परिस्थिती मध्ये हाल अपेष्टा भोगत आपल्या कार्याला करण्याचे धाडस करतो तोच खरा महान असतो. ही महानता जन्मजात निर्माण होत नसते तर ती आपल्या कृती ने मिळते.

निव्वळ कृती आंधळेपणाने करता येणार नाही, ती सकारात्मक जनतेला न्याय देणारी व शोषणाच्या आणि अन्यायाचा विरोधात महापुरुषांच्या विचाराला घेऊन असणारी पाहिजे. असे या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी कुमार मोहरमपुरी, सॅम्युअल सर, जयंत कोयरे, राजेंद्र पुडके, वैभव मजगवळी यांनी आपल्या संबोधनातून विचार मांडले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने तिमय्या दासारी, उमेश धोटे, श्रावण गेडाम, संतोष जोगदंडे, रोशन साव, सुरेश हस्ते, उत्तम भडके, परचाके बाबू, धोबीसेठ, मुस्तफा, पियुष कांबळे, विनोद येसंबरे, मनोज सोनेकर, राकेश ईग्रपवार आदी उपस्थित होते.
वणी: बातमीदार