Home Breaking News डोळ्यात मिर्चीपूड फेकून 3 लाख रुपये लुटले

डोळ्यात मिर्चीपूड फेकून 3 लाख रुपये लुटले

1534
Img 20241016 Wa0023

निंगनूर घाटातील घटना

उमरखेड : निंगनूर येथील शेतकऱ्यांने फुलसावंगी येथील व्यापाऱ्याला कापूस व भुसार साहित्य विकले. त्या शेतमालाचे पैसे घेऊन दुचाकीने गावी परतताना दोन अज्ञात दुचाकीस्वार भामट्यानी डोळ्यात मिर्चीपूड फेकून तब्बल 3 लाख 20 हजार लुटल्याची घटना दि. 24 मार्च ला रात्री 9 वाजताचे सुमारास घडली.

निंगनूर येथील गणेश भिकू राठोड या शेतकऱ्यांने आपला कापूस व अन्य शेतमाल फुलसावंगी येथील व्यापाऱ्याला विकला. त्या भुसार साहित्याचे 3 लाख 20 हजार घेऊन दुचाकीने आपल्या गावी जाण्यास निघाला. त्या शेतकऱ्यावर पाळत ठेवत दोन भामट्याने गुरुवारी रात्री पाठलाग करत निंगनूर घाटात शेतकऱ्याची दुचाकी अडवली व डोळ्यात मिर्चीपूड फेकून रोख रक्कम घेऊन पसार झाले.

अचानक घडलेल्या घटनेमुळे गणेश राठोड प्रचंड घाबरला, आरडाओरड केली तो पर्यंत आरोपी फुलसावंगी च्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी बिटरगांव पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि 392 ( 34 ) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मस्के, बीट जमादार गजानन खरात, दत्ता कुसराम हे करीत आहेत.
उमरखेड: बातमीदार