Home Breaking News मूठभर भांडवलदारांना देशातील उत्पादनाची साधने..!

मूठभर भांडवलदारांना देशातील उत्पादनाची साधने..!

192

सोमवारी कामगारांचा देशव्यापी संप 
माकप, किसानसभा व सिटू चा सहभाग

वणी : संविधानाच्या विरोधात जाऊन केंद्र सरकार ने या देशातील उत्पादनाची साधने मूठभर भांडवलदारांना देण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच विरोध करण्यासाठी देशातील कामगार सातत्याने संघर्ष करीत आहेत. म्हणूनच दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला असून माकप, किसान सभा व सिटू यांनी सहभाग नोंदवत सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

संविधानाने स्वीकारलेली समाजवादी व भांडवलदारी अशी मिश्र अर्थव्यवस्था डावलून पूर्णपणे भांडवलदारी अर्थव्यवस्था लागू करून देशातील जनतेची जवाबदारी झटकून टाकल्याचे वास्तव नाकारता येत नाही. भांडवलदारांनी कामगारांचे शोषण करून प्रचंड उत्पादन घेत, देशातील जनतेला लुटल्याचा आरोप करत 44 कामगार कायदे रद्द करून 4 श्रम संहिता तयार केल्याचे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या कायद्याचा विरोध म्हणून दि.28 व 29 मार्चला दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सी आई टी यु च्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत शासनाला निवेदन सादर केले आहे.

सोमवारी पार पडलेल्या आंदोलनाचे नेतृत्व शंकर दानव यांनी केले याप्रसंगी कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, प्रीती करमरकर, चंदा मडावी, प्रतिमा लांजेवार, किसन मोहूरले, कवडू चांदेकर, सुधाकर सोनटक्के, आनंद पानघाटे, भास्कर भगत, संभा टोंगे, अश्विनी पोटेकर, ताई डोंगरे, कुंदा देहरकर, जयश्री सोनटक्के, वंदना भगत, माधुरी मडावी, ज्योती मालेकर, माधुरी कांबळे, विनोद नवघरे, शंकर गाऊत्रे उपस्थित होते.
वणी: बातमीदार