Home वणी परिसर तू सुंदर होती, तू सुंदर आहे आजही….

तू सुंदर होती, तू सुंदर आहे आजही….

347

● कवितांनी बहरला कवी कट्टा

वणी: येथील नगर वाचनालय व विदर्भ साहित्य संघ वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 मार्चला कवी कट्ट्याच्या तिसऱ्या पुष्पाचे आयोजन करण्यात आले. या कवी कट्ट्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के हे होते. या तिसऱ्या पुष्पात जेष्ठ कवी श्रीकांत हनुमंते व रजनी पोयाम यांनी त्यांच्या 5 सर्वोत्कृष्ट रचना सादर केल्या.

सर्वप्रथम रजनी पोयाम यांनी त्यांच्या आई वर लिहलेली ‘आई’ या कवितेने सुरुवात करून पुस्तक, दामिनी, अति तिथे माती, तू सुंदर होती तू सुंदर आहे आजही, चेहरा या त्यांच्या रचना सादर करून श्रोत्यांची वाहवाह मिळविली. त्यांनतर जेष्ठ कवी श्रीकांत हनुमंते यांनी माझा 7- 12 या वऱ्हाडी रचनेने सादरीकरणाला सुरुवात करून आत्मविश्वास, त्रिसूत्री, वेदना, झोपडी या रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

अध्यक्षीय भाषणात अशोक सोनटक्के यांनी या कवींच्या कवितेचे कौतुक करून कवी कट्ट्या मध्ये नवकवींना सुद्धा संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन जेष्ठ कवी राजेश महाकुलकार यांनी केले. आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत यांनी केले.
वणी: बातमीदार