Home Breaking News केंद्र सरकारचे अभिनंदन, थाळी, ताली बजाव आंदोलन

केंद्र सरकारचे अभिनंदन, थाळी, ताली बजाव आंदोलन

445

वाढत्या महागाई चा युवासेनाने केला निषेध

वणी: देशात महागाईचा प्रचंड भडका झालेला आहे. इंधनाचे भाव दर दिवशी वाढत आहे. यामुळेच केंद्र सरकार अभिनंदनास पात्र असल्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, युवसेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशावरून थाळी, ताली बजाव आंदोलन करण्यात आले.

महागाईने सर्वच उच्चांक मोडत देशात थैमान घातले आहे. केंद्र सरकारच्या नीती नियोजनामुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे यामुळे युवासेना आक्रमक होत केंद्र सरकारचे अभिनंदन करत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार दि.3 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता थाळी, ताली बजाव आंदोलन केले.

याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, शिवसेना शहप्रमुख राजु तुराणकर, महेश चौधरी, मोंटू वाधवानी, बंटी येरणे, कुणाल लोणारे, प्रफुल बोरडे, स्वप्नील ताजने, निलेश करटबुजे, शुभम बोबडे, सचिन मांडवकर, केतन चिकटे, अमृत फुलझले, अनुप चटप, अभिजित सुरसे, राजू लोणारे, साहिल लांजेवार, सूरज मडावी,राजू गोलाईत, अभी गोलाईत, चेतन शेंडे, निखिल सोनटक्के, सचिन पाटील, हरीश शेंडे, हनुमान पायघन, विठ्ठल पाचभाई उमेश भोंगळे, प्रवीण वरारकर व युवासेना पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी: बातमीदार