● 1 लाख 35 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
● वणी पोलिसांची कारवाई
वणी: रविवार दि. तीन एप्रिल ला दुपारी भालर मार्गावरील धोपटाळा तलावाच्या मागे कोंबड बाजार सुरू असल्याची टीप मिळताच पोलिसांनी धाड टाकून सात आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एक लाख 34 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अवैद्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षकांनी सर्वच ठाणेदारांना ‘तंबी’ दिली आहे. पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य धंदे सुरु नसल्याचे प्रमाणपत्रच दरमहा सादर करावे लागत आहे. त्यातच अवैद्य व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास ठाणेदार कारवाईस पात्र ठरणार असल्याने सध्यस्थीतीत पोलीस प्रशासन ‘दक्ष’ आहे.
पोलीस स्टेशन हद्दीतील जंगल व निरव शांतता असलेल्या भागात ठराविक दिवशी लपूनछपून कोंबड्याच्या झुंजी लावून हारजित करण्यात येते. या जुगारात लाखों रुपयाची उलाढाल होते. भालर परिसरातील धोपटाळा तलावाच्या मागे झुडपात कोंबड बाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती सपोनि माया चाटसे यांना मिळताच त्यांनी पथकासह धाडसत्र अवलंबले.
यावेळी संदीप दामोधर बनकर (35) रा. गणेशपुर, स्वप्नील रामचंद्र बरडे (33)रा. माजरी, मंगेश महादेव जुनगरी (38) रा. पेटुर, गणेश भालचंद्र आवारी (24) रा. पिंपळगाव, उमेश किशोर झगझाप (25) रा. मोहुर्ली, प्रज्वल विठ्ठल राउत (25) रा. जैनलेआउट, चरणदास मनोहर लेनगुळे (44) रा. शिरपुर ता. वणी या जुगाऱ्याना ताब्यात घेत एक झुंजीचा कोंबडा, नऊ धारदार काती, दोन दुचाकी, रोख रक्कम असा एकूण एक लाख 34 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, SDPO संजय पुजलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे, दिगांबर किनाके, विठ्ठल बुरूजवाडे, सचिन मरकाम, संजय शेंद्रे, भानुदास हेपट, वसीम शेख, सागर सिडाम, गजानन गोंडवे यांनी केली.
वणी: बातमीदार