Home Breaking News लाच स्वीकारणे पडले भारी, आता दोघांना घडणार ‘तुरुंगवारी’

लाच स्वीकारणे पडले भारी, आता दोघांना घडणार ‘तुरुंगवारी’

642

 भूमी अभिलेखचे दोघे अडकले जाळ्यात 

मारेगाव: भ्रष्टाचाराने पोखरलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाचे वास्तव मंगळवारी उजागर झाले. शेतीची मोजणी लवकर करून देण्याकरीता 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारे उपअधीक्षक व लिपिक अमरावती ACB च्या जाळ्यात अडकले.

बबन श्रीनिवास सोयाम (56) मुख्यालय सहायक अतिरिक्त प्रभार उपअधीक्षक व अविनाश चंद्रकांत पाटील (47) लिपिक भूमी अभिलेख कार्यालय मारेगाव असे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या भ्रष्ट्राचारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

शेतीची मोजणी लवकर करण्यासाठी या दोघांनी शेतकऱ्यांला 25 हजार रुपयाची मागणी केली होती. त्यातील पाच हजार रुपये लिपिक पाटील यांना देण्यात आले होते तर उर्वरित रकमेत तडजोड करून 15 हजार रुपये देण्याचे ठरले.

भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला सातत्याने आर्थिक त्रास सहन करावा लागतो. नियमबाह्य अतिरिक्त पैशाची होणारी मागणी हे ACB च्या कारवाईने उघड झाले असले तरी ही बाब नवी नाही. दलालांच्या माध्यमातून होणारे व्यवहार खरी अर्थाने भ्रष्ट्राचाराला चालना देणारे ठरताहेत.

अमरावती लाच लुचपत विभागाला तक्रार प्राप्त होताच पडताळणी करण्यात आली. मंगळवार दि. 5 एप्रिल ला दुपारी चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान सापळा रचून लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी मारेगाव पोलिसात सोयाम व पाटील यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष इंगळे, पो.ना. युवराज राठोड, निलेश महिंगे, सतिश किटुकले यांनी पार पाडली.
मारेगाव: बातमीदार