Home Breaking News नंदिनी बार फोडले, 35 हजाराचा मुद्देमाल लंपास

नंदिनी बार फोडले, 35 हजाराचा मुद्देमाल लंपास

1085

मध्यरात्री चोरट्याने साधला डाव

वणी: यवतमाळ मार्गावर असलेल्या नंदिनी बिअर बार अँड रेस्टॉरंट मध्ये शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान समोरील शटर तोडून गल्ल्यातील रोकड व विदेशी दारू लंपास करण्यात आली. सदर घटना सकाळी दहा वाजता निदर्शनास आल्याने चोर शिरजोर झाल्याचे प्रकर्षाने दिसत आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून अवैद्य धंदे, लूटमार च्या घटना वाढल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या आठवड्यात मटका, जुगार, कोंबड बाजार व सुगंधित तंबाखूवर धाडी टाकून कारवाया केल्याने अवैद्य व्यवसाय सुरू असल्याचे सिद्ध झालेलं आहे.

शहरातील आणि रहदारीच्या यवतमाळ मार्गावरील नंदिनी बार मध्ये रात्री 2:40 वाजता नकाबपोष बंदा बारचे पुढील शटर तोडतो, आणि गल्ल्यातील किमान 20 हजार रुपयांची रोकड व विदेशी दारू असा तब्बल 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करतो तत्पूर्वी त्या चोरट्याने ‘नटराज’ या दुकानात सुद्धा चोरीचा प्रयत्न केला.

नव्यानेच आलेल्या ठाणेदारांना अवैद्य व्यावसायिक सलामी तर देत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील आठवड्यातील गुन्हेगारीचा लिखित आणि अलिखित आलेख बघितल्यास ‘चांगभलं’ कोणाचं होतंय हे सर्वसामान्यांना चांगलंच अवगत आहे.

नंदिनीत झालेली चोरी पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी असून मुख्य मार्गावरच आपली गस्त कमकुवत असल्याचं सिद्ध होत आहे. शहरातील अंतर्गत भागात पोलिसांची यंत्रणा किती तत्पर आहे हे यावरूनच स्पष्ट होत आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
वणी: बातमीदार