Home Breaking News चक्क …कुत्र्यालाच परिधान केले ‘भगवे वस्त्र’

चक्क …कुत्र्यालाच परिधान केले ‘भगवे वस्त्र’

2125

हिंदूंची जाहीर माफी मागावी
श्री गुरुदेव सेना आक्रमक

वणी : प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांने चक्क.. कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करून खळबळ उडवून दिली. या अनाकलनीय घटनेमुळे तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तात्काळ या घटनेची जाहीर माफी त्या भाजपा पदाधिकाऱ्याने मागावी अन्यथा श्रीगुरुदेव सेना आक्रमक भूमीका घेतील असा इशारा संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

कोरोना कालखंडातील मागील दोन वर्षे सन उत्सवावर निर्बंध होते ते यावर्षी शिथिल करण्यात आले. यामुळे येथील राम नवमी उत्सव समितीने प्रभू श्रीराम नवमी व शोभायात्रा जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय घेतला. शहरात धुमधडाक्यात आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजर आणि भगव्या पताकांनी आसमंत उजळून निघाला होता.

या उत्सवादरम्यान हिंदू भावनांना ठेच पोहचवणारी घटना घडली. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने चक्क आपल्या पाळीव श्वानाला भगवे वस्त्र परिधान करून शोभयात्रेतून शहरात भ्रमंती करवली असा आरोप भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

देशात अराजकता माजविणे याचे आम्ही समर्थक नाही असा खुलासा प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आला आहे. तसेच कोणीही हिंदूंचा आणि भागव्याचा अपमान करीत असेल तर तो आम्ही शिवरायांचे हिंदू म्हणून अजिबात सहन करणार नाही असे स्पष्ट करत ज्यांनी हे कृत्य केलं त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
वणी: बातमीदार