Home वणी परिसर रासा येथे मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

रासा येथे मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

601

वणी :- तालुक्यातील रासा येथे प्राचीन हेमाडपंथी श्री. कान्होबा देवस्थानाचा जीर्णोध्दार व विदेही संत जगन्नाथ बाबांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.16 एप्रिल ला हनुमान जयंती च्या दिवशी उत्साहात संपन्न झाला.

गावातील ज्येष्ठ नागरिक भवानी पाटील येरगुडे, प्रमोद गोहोकार ,शिवाजी पोतराजे, मारोती गोहणे, जीवन बोंडे , संतोष चिडे यांचेसह वसंत जवादे महाराजांच्या हस्ते जीर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी सकाळी गावातून शोभा यात्रा काढण्यात आली त्यानंतर मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला व संत जगन्नाथ बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

प्राचीन हेमाडपंथी मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळयासह मर्तीची प्राणप्रसिष्ठा व हनुमानाच्या दहा फूट उंचीच्या प्राचीन मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, पंचायत समिती चे माजी सभापती संजय पिंपळशेंडे, आणि वामन वरारकर यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने मारोती देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम गोहोकार यांच्या हस्ते माजी मंत्री हंसराज अहीर यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याच्या यशस्वीते साठी श्री. मारोती देवस्थान समिती व रासातील गावकन्यांची अथक परिश्रम केले.
वणी : बातमीदार