Home Breaking News बंटी-बबली ची दिवसाढवळ्या “हातसफाई”

बंटी-बबली ची दिवसाढवळ्या “हातसफाई”

3588

शहरात दुकानदारांना लुटणारी टोळी सक्रिय
टोळके तिसऱ्या डोळ्यात कैद

वणी: शहरात पटवारी कॉलनीतील काशिनाथ मेडिकल मध्ये एका महिलेने सहकाऱ्यांसह औषधी विक्रेत्या मुलीला बोलण्यात व्यस्त ठेवत दोन हजार रुपयाने गंडवले. हातसफाई ची घटना गुरुवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली असून तिसऱ्या डोळ्यात कैद झाली आहे.

शहरातील दुकानदारांना गंडवणारी व हातसफाईने रोकड लंपास करणारी बंटी-बबली ची टोळी सक्रिय झाली आहे. चोरांडे खुलेआम वावरत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. दिवसाढवळ्या व्यावसायिकांना आर्थिक क्षती पोहचविणाऱ्यांचा बिमोड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

गुरुवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान गुलाबी रंगाची प्रिंटेड साडी घातलेली व तोंड बांधून असणाऱ्या महिलेला एका व्यक्तीने मोपेड दुचाकीवरून काशिनाथ मेडिकल समोर सोडले. ती महिला औषधी दुकानात पोहचताच तिला कव्हर करणारे दोन तरुण सुद्धा तेथे पोहचले आणि औषधी विक्रेत्या मुलीला वस्तू घेण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवले.

या दरम्यान त्या महिलेने 180 रुपयाची वस्तू खरेदी करून दोन हजार रुपयांची नोट दिली. एक हजार 820 रुपये परत घेतले. तारांबळ उडताच त्या महिलेने दोन हजार रुपयांची नोट वापस मागितली आणि ती नोट परत घेत पर्स खाली लपवली आणि पोबारा केला. काही वेळाने ते तरुण सुद्धा काहीही वस्तू न घेता पसार झाले. या प्रकरणी ते टोळके तिसऱ्या डोळ्यात कैद झाले आहेत.

हातसफाईने गंडवणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याचे दिसत असून पालिके समोर दुचाकीच्या डिक्कीतून रक्कम लंपास करण्यात आली होती. तसेच शहरातील काही दुकानदारांना अश्याच प्रकारची ‘टोपी’ टाकण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. पोलिसांनी या भामट्यांचा छडा लावावा असे बोलल्याजात आहे.
वणी: