Home Breaking News कृत्रिम वीज टंचाईचा शॉक, भाजपाचे कंदील आंदोलन

कृत्रिम वीज टंचाईचा शॉक, भाजपाचे कंदील आंदोलन

330

राज्य सरकारचा निषेध

वणी: अघोषित भारनियमन, कृत्रिम वीज टंचाई यामुळे राज्यात कमालीचा रोष वाढला आहे. राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपाने राज्यव्यापी कंदील आंदोलन छेडले. सोमवार दि. 25 एप्रिल ला आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात येथील टिळक चौकात आंदोलन करण्यात आले.

वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच सर्वस्वी जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. नागरिकांना कृत्रिम वीज टंचाईचा ‘शॉक’ बसत असल्याने भाजपा आक्रमक भूमिकेत आहे. वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे.

राज्यात दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत आहे. सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे कंदील आंदोलन पुकारण्यात आले.

यावेळी रवि बेलुरकर, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार, कैलास पिपराडे, मंजु डंभारे, नितिन वासेकर, नंदकिशोर दरवे, सचिन खाडे, संदिप बेसरकर, शुभम गोरे, लवली लाल, सुधीर साळी, अरुण कावटकर, मनोज सरमुकदम, गणेश धानोरकर, आशिष डंभारे, गुरुदेव चिडे, सत्यजित ठाकुरवार, आरती वांढरे, स्मिता नांदेकर, प्रती बिडकर, संध्या लोडे, रजनी हिकरे, उषा डुकरे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार