Home Breaking News महिलेवर वारंवार अत्याचार, पोलिसात गुन्हा नोंद

महिलेवर वारंवार अत्याचार, पोलिसात गुन्हा नोंद

2155

ठाण्यात आरोपी आला अन अटकेपूर्वीच पसार झाला

वणी: शहरातील एक परिसरात शेजारी वास्तव्यास असलेल्या 45 वर्षीय महिलेवर 25 वर्षीय तरुणाने वारंवार अत्याचार केला. तक्रारीअंती दि. 20 एप्रिलला गुन्हा नोंद झाला होता. या घटनेतील आरोपी स्वतः दि. 28 एप्रिलला पोलीस ठाण्यात हजर झाला मात्र अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच तो पसार झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

मिन्टू उर्फ सौरभ बोरूले (25) असे ठाण्यातून पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो शहरातील एका प्रभागात वास्तव्यास आहे. त्याच्या शेजारीच पीडिता राहते. त्यांची एकमेकांसोबत ओळखी असल्याने त्यांच्यात संभाषण व्हायचे. एके दिवशी मिन्टू ने तिला एका महिलेच्या घरी बोलावले आणि येथेच तिची फसगत झाली.

पीडिता त्या महिलेच्या घरी गेली असता आरोपीने तिला शीतपेय प्यायला दिले आणि बळजबरीने अत्याचार केला. यावेळी त्याने तिचे मोबाईल मध्ये अश्लील छायाचित्र काढले आणि 21 मार्च ते 5 एप्रिल या कालावधी दरम्यान तो तिला ‘ब्लॅकमेल’ करत वारंवार अत्याचार करायला लागला. तिने नकार देतात ती छायाचित्रे नवरा व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत होता.

सातत्याने होत असलेल्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या पीडितेने दि. 20 एप्रिलला थेट पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मिन्टू उर्फ सौरभ बोरूले याचेवर गुन्हा नोंद केला. आरोपी वाहनचालक असल्याने परराज्यात होता तो परतल्यावर स्वतः पोलीस ठाण्यात गुरुवारी हजर झाला. परंतु अटकेच्या भीतीने अटकेची प्रक्रिया सुरू असताना त्याने पलायन केले. पोलीस त्याचा कसून शोध घेत असून त्याचेवर पुन्हा भादवि कलम 224 नुसार गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार